भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी

on Tuesday, January 18, 2011
भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥

राजा वदला , ``मला समजली शब्दांवाचुन भाषा

माझ्या नशिबासवे बोलती, तुझ्या हातच्या रेषा ''

कां राणीच्या डोळा तेव्हा, दाटुनी आले पाणी ? ॥१॥

राणी वदली बघत एकटक दूर दुरचा तारा

``उद्या पहाटे दुसऱ्या वाटा, दुज्या गांवचा वारा ""

पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी ॥२॥

तिला विचारी राजा, `` कां हे जीव असे जोडावे ?

कां दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे ?''

या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केवलवाणी ॥३॥

कां राणीने मिटले डोळे दूर दुर जाताना ?

कां राजाचा श्वास कोंदला गीत तिचे गाताना ?

वाऱ्यावरती विरुन गेली एक उदास विराणी ॥४॥

0 comments:

Post a Comment